प्रतिनिधी / शिरोळ
कनवाड ता. शिरोळ येथे बेकायदेशीर देशी-विदेशी दारूच्या बाटल्या विकणाऱ्या एकास अटक करून त्याच्याकडून दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दारूच्या बाटल्या पुरवठा करणाऱ्या अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कनवाड ता. शिरोळ येथील आरोपी संजय कल्लाप्पा कांबळे वय वर्ष 40 याने कनवाड येथील दादासो भोपाल खटावणे याच्या हॉटेल शुभम परमिट रूम बियर बार मधून देशी-विदेशी असा दहा हजार रुपये किंमतीचा माल कांबळे यांनी याने कनवाड हसुर रोडवरील भिमा कुपाडे यांच्या शेतातील ऊसाच्या बांधावर विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ डी डी सानप हनुमंत माळी ताहीर मुल्ला यांनी धाड टाकून दहा हजार रुपये किंमतीचे देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आली आहे अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत .









