@ बेळगाव / प्रतिनिधी
बेकायदेशीररित्या कासवांची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱया इसमास बेळगाव विभागिय वन खात्याच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. अमृत शिवाजी बेनके (वय 45) रा. ढेकोळी (ता. चंदगड) असे आरोपीचे नाव आहे. बेळगाव तालुक्मयातील बिजगर्णी आणि राकसकोप दरम्यान आरएफओ आर. एच. डोंबरगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून त्याला ताब्यात घेतले आहे.
सोमवारी रात्री वनखात्याच्या अधिकाऱयांना मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱयांनी संयुक्तपणे धाड टाकून ही कारवाई केली. आरोपी अमृत बेनके याने वन खात्याचे अधिकारी विनय गौडर, रमेश गिरियप्पण्णावर आणि कर्मचारी मोहम्मद किल्लेदार हे तपास करताना त्यांनाच कासव विकण्याचा प्रयत्न केला होता. एका कासवाची किंमत 5 लाख रूपये प्रमाणे विक्री करण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. यावेळीच वन खात्याच्या अधिकाऱयांनी त्याला ताब्यात घेतले. आरएफओ आर. एच. डोंबरगी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान सीसीएफ पी. बी. करूणाकर, डीसीएफ एम. व्ही. अमरनाथ आणि एस. सी. एफ. एस. एम. संगोळ्ळी आदींचे मार्गदर्शन लाभले.









