प्रतिनिधी/ सातारा
कराड तालुक्यातील शिरवडे गावच्या हद्दीत शहापूर फाटा ते तासवडे टोलनाका रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ जिल्हय़ातून तडीपार असलेले कराड तालुक्यातील दोन आरोपींना जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातील 1 लाख 50 हजार 550 रुपये किंमतीची दोन देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्याची कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 8 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे प्रतिबंध व अवैध धंद्यांवर छापा टाकण्यासाठी पेट्रोलिंग करताना कराड तालुक्यातील शिरवडे गावच्या हद्दीत शहापूर फाटा ते तासवडे टोलनाका रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ अमित हणमंत कदम वय 23 रा. अंतवडी, ता. कराड व अभिलेखावरील गुन्हेगार अल्तमेश उर्फ मोन्या हरुण तांबोळी वय 21, रा. मंगळवार पेठ, पालकरवाडा कराड हे दोघेजण पोलीस पथकास पाहताच पळून जावू लागले.
पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्टल आढळून आली. त्यांना पुढील कारवाईसाठी तळबीड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, गणेश वाघ, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, हवालदार आतिष घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोगावले, शब्बीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मंगेश महाडिक, निलेश काटकर, मुनील मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, प्रवीण कांबळे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, प्रवीण पवार, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, केतन शिंदे व वैभव सावंत यांनी सहभाग घेतला होता.








