प्रतिनिधी/ बेळगाव
बेकायदा दारू विकणाऱया दोघा जणांना रविवारी खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे. कुलकर्णी गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या जवळून 24 टेट्रापॅक व 500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
शिवराज जयवंत मोहिते (वय 30) रा. केळकरबाग, विकास प्रकाश पोरवाल (वय 43) रा. कुलकर्णी गल्ली अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
कर्नाटक अबकारी कायद्यांतर्गत त्या दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ईद-ए-मिलाद, वाल्मिकी जयंती व राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून सलग तीन दिवस दारूविक्री बंदीचा आदेश काढण्यात आला आहे. शहरात दारूविक्री बंदीचा आदेश असताना या दोघा जणांनी कुलकर्णी गल्ली परिसरात टेट्रापॅकमधील व्हिस्की विक्री सुरू केली होती. त्यामुळे त्यांना अटक झाली आहे.









