प्रतिनिधी बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱया आलिशान कारवर राज्य उत्पादन शुल्क ओरस पथकाने कारवाई केली.हि कारवाई सावंतवाडी बेळगाव मार्गावरील कारीवडे पेडवेवाडी येथील बुर्डीपूलानजीक केली.या कारवाईत महागडय़ा दारूच्या दोनशे बाटल्या जप्त करण्यात आल्या.यात 8 लाख 74 हजार पाचशे रुपयाच्या दारुसह गाडी व मोबाईल मिळून एकूण 10 लाख 84 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.हि कारवाई सोमवारी करण्यात आली. तर याप्रकरणी उमेश देवेंद्र साठे (वय 25, रा कुचेलीम बार्देश, म्हापसा गोवा) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होत असल्याने राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक बी एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग भरारी पथकाचे एस के दळवी आपल्या सहकाऱयासोबत सावंतवाडी बेळगाव मार्गावर गाडय़ाची कसून तपासणी करत होते. दरम्यान सावंतवाडीहुन बेळगावच्या दिशेने जाणारी टोयोटो कंपनीची कोरोला गाडी क्रमांक जीजे 25 ए 1122 आली असता थांबण्याचा इशारा दिला.दरम्यान गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूच्या महागडय़ा दारूच्या बाटल्या आढळून आल्या. यात स्कॉच या महागडय़ा दारूच्या दोनशे बाटल्या ऐकून किंमत 8 लाख 74 हजार पाचशे रुपये आढळून आल्या. तसेच संशयिताकडे 10 हजार रुपयाचा मोबाईल आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली 2 लाख किमतीची टोयोटो कोरोला कार असा ऐकून 10 लाख 84 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमालासह संशयितास ताब्यात घेतले.
हि कारवाई अधीक्षक बी एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख निरीक्षक एस के दळवी, दुय्यम निरीक्षक यू एस थोरात, डी एम वायदंडे, जवान आर डी ठाकूर, दीपक वायदंडे, आर एस शिंदे यांनी कारवाई केली. याबाबतचा अधिक तपास निरीक्षक एस के दळवी करीत आहेत.
तरुण भारतच्या दणक्याने राज्य उत्पादन शुल्कहि जागे……
चार दिवसापूर्वी दै तरुण भारत ने बेकायदा वाहतूक करणाऱया वाहतूकदाराना पोलीस तोडपाणी करत सोडतात अश्या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या नंतर त्यात तोडपाणी प्रमुखाचे निलंबन करण्यात आले. तर या वृत्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागही जागा झाला असून त्या नंतर हि दुसरी कारवाई या विभागाकडून करण्यात आल्याने दारू वाहतूक दारांचे सुद्धा धाबे दणाणले आहेत