लॉकडाऊन स्थितीतही व्यवसाय तेजीत
प्रतिनिधी / फोंडा
मारवासडा-उसगांव येथे राहत्या घरात बेकायदा गुरांचा कत्तलखाना चालविल्याप्रकरणी पितापुत्रासह अन्य दोघांविरूद्ध फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. खजामुद्दिन करीमसाब हकिवाला (58, मारवासडा), मोहम्मद सादिक हकिवाला (25) व मोहम्मद रफि कन्वी (37, रा. चिंबल) या तिघांना अटक करण्यात आली असून अन्य एक संशयित फरार आहे. सदर कारवाईत फेंडा पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री घटनास्थळी सुमारे 320 किलो म्हशीचे मांस जप्त करण्यात आले आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हारवासडा येथे हकिवाला यांने आपल्या घरातच हा कत्तलखाना चालविलेला आहे. त्यांनी दोघां म्हशीची कत्तल करून गोमांस आपल्या गिऱहाईकांना दिल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. त्याच्याकडून सुमारे 320 किलोचे मांस जप्त करण्यात आले आहे. चिंबल येथून आलेला मोहम्मद कन्वी याचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करतेवेळी हकिवाला यांच्या घरात अन्य तीन गायी आढळल्या असून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यासाठी सोपस्कर पुर्ण आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुरांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या वाहनांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.
याप्रकरणी तिघांही संशयिताविरोधात भा.द.स. कलम 188, 429 तसेच प्राण्याची प्रुरता रोखणे कायद्याखाली अटक करण्यात आली असून चौथ्या फरारी संशयिताचा शोध सुरू आहे. याप्रकरणी निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज काणकोणकर अधिक तपास करीत आहे. गोमांसाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस राज्यांच्या सीमावर पाहणीपथक दिवसरात्र तैनात ठेवले आहे. लॉकडाऊनच्या स्थितीतही राज्यात बेकायदा कत्तलखाने चालवून विक्री करण्याचे प्रकार मात्र सर्रास सुरू आहे.









