वार्ताहर/विजापूर :
बेकादेशीररित्या अफीम विकणाऱया दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून सुमारे एक लाख किमतीचे 4 किलो अफीमसह त्याच्याजवळील ट्रक जप्त करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील हिटनहळ्ळी येथे घडली. मुनीराम बिसनोई आणि पुनमचंद बिसनोई अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. उत्पादन शुल्क खात्याच्या निरीक्षक महादेव पुजारी यांच्या नेतृत्त्वाखाली भीमण्णा कुंभार, परशुराम तेलगी यांनी कारवाई केली.









