वार्ताहर /नंदगड
बेकवाड ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी यल्लाप्पा मारुती गुरव (बेकवाड) हे विजयी झाले. तर उपाध्यक्षपदी मोहिनी मोहन यळ्ळूरकर (हडलगा) यांची बिनविरोध निवड झाली.
बेकवाड ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. अध्यक्षपद अ वर्ग राखीव तर उपाध्यक्षपद सामान्य महिलेसाठी होते. अध्यक्षपदासाठी यल्लाप्पा गुरव विरुद्ध नूतन रामू भुजगुरव (खैरवाड) यांच्यात निवडणूक लागली.
बेकवाड ग्रामपंचायतीच्या एकूण 12 सदस्यांपैकी 11 सदस्यांनी निवडणुकीत भाग घेतला. यामध्ये यल्लाप्पा गुरव यांना 8 मते तर नूतन भुजगुरव यांना 3 मते मिळाली. त्यामुळे यल्लाप्पा गुरव यांची अध्यक्षपदासाठी निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱयांनी घोषित केले.
या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, गुणवंती तळवार, संजय कोलकार, शबाना मुजावर, परशराम मडवाळकर, नामदेव कोलेकर, रुक्माणा झुंजवाडकर, गंगू तळवार आदांनी सहभाग दर्शविला. ग्रामपंचायत सदस्या ज्योती गुरव गैरहजर राहिल्या.
निवडणूक अधिकारी म्हणून देवराज एम. जी. यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत पीडीओ नागापा बन्ने यांनी ग्राम पंचायतीच्यावतीने नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांचे पुष्पहार घालून सत्कार केला. तसेच बेकवाड ग्रामस्थांच्यावतीने नूतन अध्यक्ष यल्लापा गुरव, उपाध्यक्षा मोहिनी यळ्ळूरकर यांचा गाव कमिटीच्यावतीने हार घालून सत्कार करण्यात आल. यावेळी बेकवाड व हडलगा गावातील ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व सदस्य तसेच समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. वरील दोघांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करून विजयोत्सव साजरा केला.









