बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत बेंगळूर (शहरी व ग्रामीण) येथील सरकारी आणि खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील कोविड -१९ रूग्णांसाठी राखीव ठेवलेल्या एकूण ५,९१६ बेड पैकी तब्बल ४,५४९ बेड ताब्यात घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या आकडेवारीत नमूद करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना रूग्ण वाढत असून राजधानी बेंगळूरमध्येही कोरोनाचा वेग वाढत आहे. राज्यात कोरोना परिस्थिती भयंकर होण्याआधी सरकारने खासगी रुग्णालयांना ५० टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगितले आहे. जर सरकारच्या नियमांचेपालन न केल्यास आणि ५० बेड खासगी रुग्णालयांनी आरक्षित न ठेवलीस सर्वै करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.









