बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत. देशात सुरु दुसर्या लाटेमुळे राज्यात काही ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान बेंगळूरमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि पब मालकांनी राज्य सरकारकडे उद्योगात टिकून राहण्यासाठी मालमत्ता कर, वीज बिलावरील निश्चित शुल्क आणि उत्पादन शुल्क परवान्यात सूट मिळावी अशी मागणी केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना पाठवलेल्या पत्रानुसार बृह बेंगळूर हॉटेल्स असोसिएशनचे (बीबीएएचए) अध्यक्ष पी. सी. राव यांनी नमूद केले की, “गेल्या वर्षी कोरोना-लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानीपासून हॉटेल उद्योग डबघाईला आले आहेत. आता तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेही उद्योगाला पुन्हा धडक दिली आहे. ५० टक्के आसन नियम आणि रात्रीच्या कर्फ्यूमुळे या वेळी अधिक नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले.
बीबीएचएने केलेल्या इतर मागण्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न सुरक्षा आणि कर्नाटक दुकाने व आस्थापना अधिनियमानुसार आकारण्यात आलेल्या परवान्यासाठी ५०टक्के सूट देण्यात आली आहे.