बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक अब्दुल रकीब झाकीरला शहर कोर्टाने ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुलकेशीनगर प्रभागातील फरार असणारा माजी नगरसेवक झाकीरला बुधवारी रात्री मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. जवळपास दोन महिन्यांपासून तो फरार होता आणि संपत राजबरोबर तो शोधात होता. १२ ऑक्टोबरला दाखल केलेल्या अंतरिम आरोपपत्रात सीसीबीने त्याला आरोपी म्हणून घोषित केले होते. आरोपपत्रानुसार, ११ ऑगस्ट रोजी कावळ बायरसंद्रा येथील पुलिकेशिनगरचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या घराला आग लावण्यात आली होती. याप्रकरणी या कटात सहभाग आणि हिंसाचारासाठी जमावाला भडकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
झाकीरला गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीसीबीच्या पथकाने पुढील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कोठडी घेण्याचे स्पष्ट केले.









