बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचाराच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीसीबी पोलिसांनी माजी महापौर आर संपत राज यांना अटक केल्याची माहिती दिली. दरम्यान गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी संपतराज यांना अटक ही एक मोठी प्रगती असल्याचे म्हटले आहे.
गृहमंत्री बोम्माई यांनी संपतराज निर्दोष असता तर फरार झाला नसता, असे बोम्मई म्हणाले. ते फरार होता त्यामुळे तो आरोपी आहे. आता पोलिसांनी त्याला पकडले आहे, पुढील चौकशी केली जाईल आणि त्या प्रकरणात असणारे आणखी बऱ्याच जणांची नवे पुढे येतील, असे ते म्हणाले.
दरम्यान बेंगळूरचे माजी महापौर आणि डी. जे. हळ्ळी, के.जी. हळ्ळी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आर. संपत राज याला सीसीबी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती.









