बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी पूर्व बेंगळूर दंगली प्रकरणी अटक केलेल्या ११५ लोकांना जामीन मंजूर केला आहे. पुलकेशिनगरचे आमदार आर. अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर शहरात दंगल झाली होती. यावेळी जमावाने पोलीस ठाणे व मूर्तीच्या घराचे नुकसान केले होते. दरम्यान जमावाने यावेळी पोलीस ठाण्यासमोर मोडतोड तसेच रस्त्यावर लावलेली वाहने जाळली होती. तसेच आमदार मूर्ती यांच्याही निवास्थानाला आग लावली होती. या आगीमध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) चौकशी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ९० दिवसांचा कालावधी देण्याचा उच्च न्यायालयाने विशेष कोर्टाचा आदेश बाजूला ठेवला. कोर्टाने म्हटले आहे की आरोपीला अधिसूचित केल्याशिवाय अशी मुदतवाढ देणे कायदेशीररित्या असुरक्षित आहे.









