बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक हायकोर्टाने पुलकेशी नगर येथील कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा नवीन याला शुक्रवारी जामीन मंजूर केला. पूर्व बेंगळूरच्या भागात हिंसाचार झाल्याचा आरोप असून यावर्षी ऑगस्टमध्ये डीजे हळ्ळी पोलीस स्टेशनवर हल्ला झाला होता. सोशल मीडियावर वादग्रस पोस्ट टाकल्याने हिंसाचार झाला होता. नवीनला १४ ऑक्टोबरला जामीन मिळाला होता, परंतु २ लाख रुपयांची मुचलके दिल्यानंतरच त्याची सुटका होईल.
कोर्टाने नवीनला बेंगळूर सोडू नये, प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात हजर रहावे, पुराव्यांमध्ये अदला बदल करु नये आणि सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकू नयेत असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.