बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मधील डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे पूर्व बेंगळूरमध्ये हिंसाचार झाला. याप्रकरणी एसडीपीआय, पीएफआय यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. पण कर्नाटकचे मंत्रिमंडळ या संदर्भात कोणत्याही निर्णयावर पोहोचले नाही. असे भाजप नेत्यांनी म्हंटले आहे.
गुरुवारी बेंगळूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कायदा व संसदीय कार्यमंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी या संदर्भात विस्तृत चर्चा झाली पण अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे ते म्हणाले.
11 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपांमुळे राज्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वर बंदी घातली जाईल काय, या विषयी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया व्यक्त केली.