बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये ऑगस्टला डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी येथे हिंसाचार घडला होता. या हिंसाचाराची चौकशी करणार्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) सोशल मीडिया डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १७ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
११ ऑगस्ट रोजी पोलिसांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. जमावाने डीजे हळ्ळी पोलीस स्टेशन आणि कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मुर्ती यांच्या घराला आग लावण्यात आली होती. आमदार मुर्ती यांच्या नातेवाईकाने वादग्रस्त फेसबुक पोस्ट केल्याने हा हिंसाचार झाला होता. २२ सप्टेंबर रोजी एनआयएने बेंगळूर पोलिसांकडून हा खटला ताब्यात घेतला होता.
एनआयएच्या निवेदनानुसार एसडीपीआय नेत्यांनी मो. शरीफ, इम्रान अहमद, रुबा वकास, शब्बर खान आणि शैक अजमल यांनी ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी बेंगळूरमधील थानिसंद्र आणि केजी हळ्ळी वॉर्डात बैठक घेतली होती. केजी हळ्ळी पोलीस ठाण्यात जमावाने जनतेचे आणि पोलीस स्टेशनच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. असे एनआयएने सांगितले आहे.