बेंगळूर/प्रतिनिधी
शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून नुकतेच बेंगळूरला १३९.५ कोटी रुपये मिळाले आहेत.
१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे बृह बेंगळूर महानगर पालिका (बीबीएमपी) अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी १५ राज्यांना त्यांच्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पहिला हप्ता म्हणून २,२०० कोटी रुपये जाहीर केले. यामध्ये कर्नाटकातील बीबीएमपीसाठी शहरी स्थानिक संस्था अनुदान म्हणून १३९.५ कोटी अनुदान दिले आहे.
कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह (केएसपीसीबी) सोबत हवेच्या गुणवत्तेशी संबंधित सर्व डेटाच्या देखरेखीसाठी केंद्रीय नियंत्रण व कमांड सेंटर सुरू करण्याचा विचार बीबीएमपी करीत आहे. नागरी संस्था सार्वजनिक जागांमधील कचरा (सी अँड डी) आणि सी अँड डी कचरा-संबंधित प्रदूषण आणि इतर प्रकल्पांची तपासणी करण्यासाठी अंमलबजावणी करेल.









