बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे बेडची कमतरता भासत आहे. ती टाळण्यासाठी कोविड तज्ञ समितीने डिस्चार्ज संदर्भातील नियमात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. चिकित्सकांच्या मते, जर भविष्यात रुग्णांची संख्या वाढली तर बेडची कमतरता पडू शकते. आयसीयू बेडवर आधीच ओझे आहे. गेल्या एका आठवड्यात दररोज सरासरी ९०० पेक्षा जास्त रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
शासनाने खासगी रुग्णालयांना ५० टक्के बेड देण्यास सांगितले आहे. पण आश्वासन देऊनही शासनाला ५० टक्के बेड न देणाऱ्या १० खासगी रुग्णालयांवर कारवाई करूनही रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाही. आयसीयू बेडसाठीही रुग्ण धडपडत आहेत. गुरुवारी, रक्तातील ऑक्सिजनची पातळी खाली आल्यानंतर ७० वर्षांच्या रूग्णाला आयसीयू बेडसाठी एका हॉस्पिटलमधून दुसर्या हॉस्पिटलमध्ये भटकंती करावी लागली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सरकारी कोट्याच्या बेडवर खासगी रुग्णालये अजूनही इतर रूग्णांना भरती करण्यापासून रोखत नाहीत.
बेड व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले तुषार गिरीनाथ यांचेही मत आहे की खाजगी रुग्णालयांमध्ये बेडची योग्य संख्या तयार करण्यात अनेक स्तरावर अडचण आहे. खासगी रुग्णालयांना रिक्त बेडची संख्या वेब पोर्टलवर अपलोड करावी लागेल परंतु नियमांचे पालन केले जात नाही. सरकारी कोट्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या बेडवर देखरेख ठेवण्याचेही आव्हान आहे. बर्याच वेळा आरोग्य विभागाची टीम दररोज सकाळी रुग्णालयांना फोन करून रिकाम्या बेड विषयी माहिती घेते.
तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. सुदर्शन बल्लाळ यांनी स्थिर रुग्णांना वेळेपूर्वीच सोडण्यात येते. रूग्णांवर पुढील उपचार घरीच करता येतील पण वैद्यकीय देखरेखीखाली. असे झाल्यास ५० टक्के अधिक बेड उपलब्ध होतील. घरगुती उपचारांशी संबंधित आणि धोक्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना डॉ. बल्लाळ यांनी आवश्यक असल्यास रुग्णाला कोणत्याही वेळी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते असे ते म्हणाले.