बेंगळूर /प्रतिनिधी
सीसीबीने रागिणीला आज राहण्याचे आदेश दिले आहेत. रागिणीने सीसीबीकडे सोमवारी हजर राहण्याची विंनती केली होती. ती सीसीबीने ती अमान्य केली आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीत अंमली पदार्थांचे सेवन आणि तस्करीच्या प्रकरणाची चौकशी करणार्या सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) चित्रपट अभिनेत्री रागिणी द्विवेदी हिचा युक्तिवाद नाकारला आहे. सीसीबीने तिला आज हजर होण्यासाठी नोटीस पाठविली आहे.
रागिणी गुरुवारी सीसीबीसमोर हजर होणार होती पण त्या छोट्या नोटीसचे कारण देत हजर राहिली नाही आणि तिने सोमवारी स्वत: हजर होण्याची परवानगी मागितली. यासाठी तिचा वकील सीसीबीसमोर हजर झाला होता.
पुन्हा पाठविलेल्या नोटीसची पुष्टी करत एका पोलीस अधिकाऱ्याने, रागिणीला शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले असल्याचे म्हंटले आहे.
रागिणीने ट्विट केले होते की, माझ्याकडे लपवण्यासारखे काही नाही आणि सीसीबीमार्फत चौकशी करण्यात येत असलेल्या कोणत्याही बेकायदेशीर कार्यात मी सामील नाही.