बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मंत्री आणि पोटनिवडणुकीसाठी तुमकूरमधील सीरा मतदार संघाचे कॉंग्रेसचे उमेदवार टी. बी. जयचंद्र यांना सोमवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. पत्नीच्या सकारात्मक चाचणीनंतर एका दिवसानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जयचंद्र यांनी माझ्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून माझी कोरोना चाचणी करून घेतली. कोरोना अहवालानंतर मला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे मी मतमोजणीला भाग घेऊ शकणार नाही, तरीही आपणा सर्वानी आत्मविश्वासाने जाण्याची विनंती करतो. आमचा विजय असेल असे त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.









