बेंगळूर/प्रतिनिधी
अभिनेत्री संजनाला ड्रग्ज दिल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) दोन तस्करांना अटक केली आहे. जोआब (वय २४) आणि आनंद (वय ३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संजनाला अटक झाली तेंव्हा ते दोघे तामिळनाडूला पळून गेले होते असे सांगण्यात आले आहे. या दोघांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली होती. दोघेही मंगळवारी सकाळी चेन्नईहून बेंगळूरला पोहोचले आणि त्यांना धूपनहळ्ळीच्या बसस्थानकात अटक केली.
दोघांना चामराजपेट येथील सीसीबी मुख्यालयात नेण्यात आले आणि चौकशी सुरु आहे. पोलिसांना समजले आहे की संजना व्यतिरिक्त ते दोघे कन्नड फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना आणि अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांना ड्रग्ज पुरवत असत.