बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात बेड,व्हेंटिलेटर आणि रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असताना सिंगापूर आणि स्वीडनमधील एकोणतीस व्हेंटिलेटर गेल्या तीन दिवसांत केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) दाखल झाले आहेत. रुग्णालयांना कोविड -१९ रूग्णांसाठी या मशीनची नितांत आवश्यकता आहे.
केंद्र सरकारने कोविड -१९t लढासाठी आयात केलेल्या वैद्यकीय उत्पादनांना ७.५ टक्के कस्टम ड्युटी आणि ३ टक्के आरोग्य सेसमधून सूट दिली आहे. केआयएच्या मालवाहू शाखेतल्या कस्टम अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शनिवारी सिंगापूरहून बेंगळूरमध्ये ३ कोटी रुपयांच्या ५४ उच्च-अंतराच्या व्हेंटिलेटरची खेप दाखल झाली. एका खाजगी कंपनीने आयात केली होती.
दरम्यान सोमवारी, ३५ लाख रुपयांच्या ४५ पोर्टेबल व्हेंटिलेटरची तुकडी स्विडनहून उतरली आणि त्याच दिवशी ती मोकळी झाली. तसेच आगामी काळात अधिक उपकरणे येण्याची अपेक्षा आहे.