बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यन राजधानी बेंगळूरमध्येही कोरोनाची संख्याही वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे बेंगळूर विद्यापीठाने २ ५ सप्टेंबरपासून घेण्यात येणारी अंतिम वर्षाच्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा आता ४ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या सुधारित वेळापत्रकानुसार युजीच्या परीक्षा ४ आणि ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर पीजीच्या ६ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.









