नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आठवड्यात ३.८१ कोटी दंड जमा
बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर ट्रॅफिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांकडून ३,८१,४४,८०० रुपये दंड जमा केला. ट्रॅफिक सह पोलीस आयुक्त बी. आर. रविकांत गौडा यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेल्मेट न घातल्याबद्दल दुचाकीस्वारांकडून १.११ कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला, दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याने चालकांकडून आणखी ६७. ८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, सुमारे १०,६८७ वाहन चालकांनी वाहतूक सिग्नल नियमांचे उल्लंघन केले आहे. दरम्यान एकाच वेळी एकूण ८१ वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याने एकूण ८९,९५७ प्रकरणे दाखल केली गेली आहेत.
यापूर्वी शहरातील रहिवाशांनी १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान नोंदविलेल्या ८६,३८० वाहन चालकांनी नियमांचे पालन न केल्याने आणखी ३.६३ कोटी रुपये जमा केला आहे.









