बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर ट्रॅफिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात शहरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईक करत २,१४,३८,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ट्रॅफिक पोलीस सह आयुक्तबी. आर. रविकांत गौडा यांनी कर्मचाऱ्यांनी १३ ते १९ सप्टेंबर दरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत हा दंड वसूल केला आहे.
दरम्यान दंडामध्ये दुचाकीस्वारांकडून हेल्मेट न घातल्याबद्दल ६६.०१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला, तर अन्य कारणासाठी चालकांकडून ४१.७६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, सुमारे ४,८०४ लोक वाहतुक सिग्नल तोडताना पकडले गेले. एकाच वेळी एकूण ७२ वेगवेगळ्या उल्लंघनांसाठी ४८,१४१ गुन्हे दाखल केले आहेत.
मागील वर्षी बीटीपीने ९८.२७ लाख रुपये दंड म्हणून लाख जमा केले होते. ऑगस्टच्या दोन आठवड्यात ९८.२७ लाख रुपये आणि त्यानंतर सप्टेंबरच्या सहा दिवसांत ७२.४९ लाख रुपये दंड म्हणून जमा केले होते.