बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात लॉक डाऊन दरम्यान अनेकांनी सेवा बजावली आहे. यामध्ये बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (बीएमटीसी) बेंगळूरमध्ये लॉकडाऊन दरम्यान काम केलेल्या, ३ हजार पेक्षा जास्त कर्मचार्यांना दिवसाला २५० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएमटीसीने जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार २६ मार्च ते २० एप्रिल दरम्यान काम करणाऱ्या ३३९७कर्मचार्यांनी शहरातील जीवनावश्यक सेवेमध्ये जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे.
बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (बीएमटीसी) बेंगळूरमध्ये लॉकडाऊन दरम्यान काम केलेल्या ३ हजार पेक्षा जास्त कर्मचार्यांना दिवसाला २५० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.