बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची संभावना आहे. दरम्यान कर्नाटकात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत तसेच कोरोनावर नियंत्रण राहावे यासाठी बेंगळूर महानगरपालिका प्रशासनाने कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. बेंगळूरमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर बृह बेंगळूर महापालिकेने शहरातील विविध भागातील लग्न समारंभात मार्शल तैनात करण्यात आले आहेत.
राज्यात घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने प्रशासनाने पुन्हा कठोर कारवाई सुरु करण्यास सुरुवात केली आहे. बीबीएमपीने आता सार्वजनिक कार्यकर्मात मार्शल तैनात करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ते लोक सामाजिक अंतर पाळत आहेत आणि मुखवटा घालून आहेत की नाही याची तपासणी करणार आहेत









