बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या दृष्टीने गर्दी टाळण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेने गुरुवारी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत ४०० टक्क्यांनी वाढ केली आहे.
बेंगळूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत १० रुपयांवरून ५० रुपये केली आहे. हे नवीन दर क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सिटी रेल्वे स्टेशन, बेंगळूर कॅन्टोन्मेंट आणि यशवंतपूर रेल्वे स्थानकांना लागू असेल, असे रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे.
रेल्वे स्टेशनमध्ये, ज्येष्ठ नागरिक, वेगळ्या सक्षम, मुले आणि विद्यार्थी अशा प्रवाशांना सोडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर लोक येत असल्याने प्लॅटफॉर्मचे तिकीट देण्याची जनतेकडून मागणी वाढत आहे. जनतेच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म तिकिटे देण्यात येतील. असे एसएसडब्ल्यूआरने सांगितले असून नवीन दर केएसआर बेंगळूर, यशवंतपूर आणि बेंगळूर कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकांवर तातडीने लागू करण्यात आले आहेत.
एसव्हीडब्ल्यूआरने कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत पुढील आदेशापर्यंत १० रु वरून ५० रुपये असणार आहे









