बेंगळूर/प्रतिनिधी
राष्ट्रपती राम नाथ कोविंद ४ फेब्रुवारीला बेंगळूर येथे दाखल झाले. राष्ट्रपती कोविंद यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी एचएएल विमानतळावर स्वागत केले. दरम्यानन राष्ट्रपती कोविंद संध्याकाळी येळहंका हवाई दल स्थानकात एरो इंडिया-२०२१ च्या व्हेलिडिक्टोररी कार्यक्रमास संबोधित करणार आहेत. आज एरो इंडिया-२०२१ या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
राष्ट्रपती ६ फेब्रुवारी रोजी कोडगू जिल्ह्यातील मडिकेरी येथे भेट देणार आहेत. यावेळी ते जनरल थिमय्या यांच्या पूर्वीच्या वडिलोपार्जित घरात संग्रहालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यांनतर ७ फेब्रुवारीला राष्ट्रपती बेंगळूरमधील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २३ व्या वार्षिक दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार आहेत.