बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची सांख्य वाढत असताना राज्याच्या राजधानीत लसीचा तुटवडा असल्याचा बीबीएमपी मुख्य आयुक्तांनी उल्लेख करत बीबीएमपीने प्राथमिकतेनुसार गरजूंना लस देण्याचा निर्णय घेतला आहे, ते म्हंटले आहे. दरम्यान, राज्याच्या राजधानीत लसींचा तुटवडा असल्याने बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी बुधवारी ज्यांना लसीची आवश्यकता आहे अशा गरजूंना लस देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
आयुकर गुप्ता म्हणाले, “ज्यांना दुसरा डोस घेण्याची आवश्यकता आहे आणि ज्यांचे ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना प्लस देण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. लस पुरेसा पुरवठा झाल्यास १८ ते ४५ वर्षांपर्यंतची लस दिली जाईल,” असे गुप्ता म्हणाले.
शहरात पुरेशी लस साठवण्याची सुविधा आहे परंतु लस केवळ लस उप्लब्धतेवरच लस दिली जात आहे. सर्व नागरिकांनी कोविन पोर्टलवर पूर्व नोंदणी करून वेळापत्रक निश्चित झाल्यानंतरच लसी केंद्रांना भेट देण्याची विनंती केली. यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येने गर्दी होणार नाही. याव्यतिरिक्त, खासगी रुग्णालयांमधील काही लस केंद्रांमध्ये लसीची कमतरता असल्याने मोजक्याच रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जात आहे. राज्याला ३ कोटी लसांची आवश्यकता असून शहराच्या लोकसंख्येनुसार मागणी केली गेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात चाचणी किट आणि प्रयोगशाळेची कमतरता नाही, असे मुख्य आयुक्तांनी सांगितले की त्यांनी लक्षणे असलेले लोक आणि त्यांचे प्राथमिक संपर्क आणि त्यांच्याशी जवळीक साधून आलेल्या इतरांची त्वरित चाचणी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.









