बेंगळूर/ प्रतिनिधी
मार्च महिन्यात बंद झालेली मोट्रो सेवा पुन्हा सुरु होणार आहे.केंद्राने ७ सप्टेंबरपासून ‘अनलॉक ४’ अंतर्गत देशभरात मेट्रो ट्रेन सेवा हळूहळू पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
४४ स्थानकांवर ४२. कि.मी. नेटवर्क असलेली बेंगळूर मेट्रो ७ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. सामाजिक अंतर कायम ठेवण्यासाठी प्रवाशांची संख्या सहा डब्यांच्या ट्रेनमध्ये क्षमतेच्या एक तृतीयांशपुरती मर्यादित असेल तर प्रवेशद्वारावर थर्मल टेस्टिंग केले जाईल. प्रवाशांना संपर्क ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात येईल आणि फक्त ई-तिकिटे दिली जातील.
सध्या मेट्रो १० शहरांमध्ये कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद, जयपूर, गुडगाव, मुंबई, कोची आणि लखनऊ कार्यरत आहेत. मेट्रोला शहराची जीवनरेखा समजल्या जाणार्या दिल्लीसारख्या काही शहरांमध्ये, वाहनचालकांचा आत्मविश्वास पुनर्संचयित करणे नजीकच्या भविष्यात एक आव्हान ठरणार आहे.









