बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरापा यांनी कोरोना काळात लॉकडाउन लागू झाल्यानंतर बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीएमआरसीएल) 25 मार्च रोजी आपली सेवा स्थगित केली होती. ती लवकरच सुरु केली जाईल असं म्हंटलं आहे.
बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना येडीयुरप्पा यांनी कोरोना प्रादुर्भाव असूनही सार्वजनिक जीवन सर्वसाधारणपणे पूर्वपदावर आणले जात आहे. सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना घेत शहरात लवकरच मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्ही केंद्राच्या मंजुरीचीही वाट करीत आहोत, असे म्हंटले.
बीएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले आहे की, ते केंद्राकडून अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांची (१ सप्टेंबरपासून) प्रतीक्षा करीत आहेत आणि पुन्हा कामकाज सुरू करण्यास मान्यता मिळतील अशी आशा आहे.