बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर यांच्या नावाने उभारलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले.
बेंगळूर महानगर पालिकेने लॉकडाऊनमुळे यावर्षी मे मध्ये होणार वीर सावरकर उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला होता. लॉकडाऊन उठल्यानंतर आया ह्या उडडाणपूलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यापूर्वी कॉंग्रेस आणि जद (एस) या दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या नावावरुन राज्य सरकारने नाव ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे उड्डाण पुलावरुन बराच वाद निर्माण झाला होता.









