बेंगळूर : बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी बेंगळूर महापालिकेच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या निवासस्थान, कार्यालयासह चार ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाने (एसीबी) छापे टाकले आहेत. एसीबीच्या चार पथकांनी शुक्रवारी पहाटे बेंगळूर, चेन्नगिरी, दावणगेरे या ठिकाणी तडकाफडकी छापे टाकून मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. बोम्मनहळ्ळी येथील बेंगळूर महानगरपालिकेच्या उपविभागात काम करणारे सी. टी. अंजनप्पा यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी पहाटे चार ठिकाणी धाडी टाकून चौकशी सुरू केली. अंजनप्पा यांच्या बेंगळुरातील निवासस्थानी छाप्यावेळी इनोव्हासह दोन कार, एक दुचाकी, 3.5 लाख रुपयांची रोकड तसेच दावणगेरेच्या आरेहळ्ळी येथील कारवाईवेळी 9.79 लाख रु. रोख, 7 एकर सुपारीची बाग, चार वाहने आढळून आले असल्याचे समजते.
Previous Articleआतापर्यंत 1,38,656 जणांना लस
Next Article केंद्र सरकारकडून कर्नाटकाला ‘प्लास्टिक पार्क’ मंजूर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









