१ हजार बेडचे रुग्णालय स्थापन करण्याची मागणी
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कोविड -१९ प्रकरणांमध्ये दररोज वाढ होत आहे. दरम्यान राज्यातील रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर बेंगळूर मध्यवर्ती लोकसभेचे खासदार पी.सी. मोहन यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून एक १ हजार खाटांचे रुग्णालय स्थापण्यासाठी सशस्त्र दलाला निर्देश देण्याचे आवाहन केले आहे.
पत्रात त्यांनी राज्य व राजधानी शहर बेंगळूरमधील कोविडच्या सद्यस्थितीबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांत एकट्या बेंगळूरमध्ये दररोज २० हजारापेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे म्हंटले आहे.
बेंगळूरमध्ये अनेक संरक्षण आस्थापने आहेत, ज्यात आयएएफद्वारे संचालित कमांड हॉस्पिटल आणि इतर वैद्यकीय संघटनांचा समावेश आहे. मोहन यांनी लिहलेल्या पत्रात, सशस्त्र दलाच्या तुकड्यांनी कोविड केअर सेंटर, वैद्यकीय सेवा केंद्रे स्थापन करण्याच्या व एकूण खाटांचा काही भाग सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.