बेंगळूर / प्रतिनिधी
बेंगळूर भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या हे व्हिक्टोरिया रूग्णालयात एका संक्रमित डॉक्टरांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वत: ची कोरोना तपासणी केली. तपासणी नंतर तेजस्वी सूर्या यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सूर्या आणि मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पाचे राजकीय सचिव एस.आर. विश्वनाथ यांची नुकतीच कोरोना चाचणी झाली. व्हिक्टोरिया हॉस्पिटलच्या डीननी या दोघांनाही क्वारंटाईनमध्ये सूट दिली आहे.
तेजस्वी सूर्या यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी कोरोनातून मला दिलासा मिळाल्याचं म्हंटल आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी कोरोना चाचणी केली असेही ते म्हणाले.