बेंगळूर/प्रतिनिधी
काँग्रेसचे माजी मंत्री के. जे. जॉर्ज यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पत्र लिहून द्वितीय पीयू परीक्षांचे आयोजन करताना खूप सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे. तसेच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देण्याचा सल्लाही दिला आहे.
देशात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान कर्नाटकातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात “तज्ज्ञांनी इशारा दिला होता, की येत्या काही महिन्यांत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्य सरकारने काळजीपूर्वक खबरदारी घ्यावी, तसेच बोर्डाच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे” असे माजी मंत्री जॉर्ज यांनी येडीयुरप्पा यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
माजी मंत्री जॉर्ज यांनी, “मी राज्य सरकारला विनंती करतो की, द्वितीय पीयूसी परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशासन लवकरात लवकर लसीकरण करावे, जेणेकरून त्यांना या जीवघेणा रोगापासून बचाव करता येईल.
जॉर्ज यांनी असेही म्हटले आहे की परीक्षा कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व कर्मचारी आणि शिक्षकांनाही लसीकरण करण्यात यावे, असे ते म्हणाले, “आमचे उद्दीष्ट जीव वाचविणे हे आहे, त्यासाठी का पत्करू नये”, असे ते म्हणाले.









