बेंगळूर/प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे ‘ब्लॅक फंगस’ औषधांची विक्री करताना एका अभियंत्यास अटक केली आहे. दरम्यान, सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी एका ४५ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्यास अटक केली, ज्याने ब्लॅक फंगसच्या उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे बेकायदेशीरपणे विकली आहेत.
सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) परमेश्वर एच. एस. यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने कुंडलहळ्ळी येथील रहिवासी रामा मोहन टी. याला अटक केली. तो बेकायदेशीर औषधांची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यांनतर पुरम स्थानकाजवळील आयटीआय कंपनी येथे येथे धाव घेत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी मोहन यांच्याकडून सुमारे १७ इंजेक्शन्स आणि ८० गोळ्या जप्त केल्या आहेत. मोहन १८ हजार रुपयात औषधांची विक्री करण्याची ऑफर देत होता, तर त्याची एमआरपी ५ हजर रुपये आहे. दरम्यान मोहनने आपण सॉफ्टवेअर अभियंता असून सध्या बेरोजगार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
मोहन यांनी बासवणगुडी येथील फार्मसीमधून औषधे ऑनलाइन खरेदी केली आणि व्हॉट्सअॅपवर संदेश पाठविला की त्याने त्यांचा साठा केला आहे. रूग्णांच्या कुटूंबातील सदस्य म्हणून पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि औषधे घेण्यासाठी गेले असता त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला कार्यक्षेत्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.