बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर महानगरपालिकेने शहरांमध्ये झाडे मोजण्याकरिता कृषी विद्यापीठाची मदत नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. दरम्यान यासाठी गठीत झालेल्या २१ संघ सदस्यांना दरमहा १० हजार रुपये वेतन दिले जाते. त्या अनुषंगाने झाडांच्या देखभालीसाठी वर्षाकाठी ७ कोटी ९२ लाख रुपये खर्च केले जात आहेत.
शहरातील विविध उद्याने, परिसरातील परिसरातील झाडे मोजण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ४५ हजार झाडे मोजली गेली आहेत. बीबीएमपीकडे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे, बेंगळूर कृषी विद्यापीठाचे कुलगुरूंकडे या कार्यात मदतीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.आता पर्यंत वृक्ष गणनेसाठी ४ कोटी ३२ लाख खर्च झाले आहेत.
कर्नाटक हायकोर्टाने जनहित याचिकेवर सुनावणी करताना बीबीएमपी आयुक्तांना शहरातील झाडांची मोजणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सन २०१४ मध्ये भारतीय विज्ञान संस्थेने उपग्रह आधारित तंत्रज्ञानाने केलेल्या वृक्ष गणनेच्या अहवालानुसार शहरातील झाडांची संख्या १४ लाख ७८ हजार ४१२ इतकी होती. अशी अनेक ठिकाणी जिथे झाडांची संख्या १०० पेक्षा कमी होती.
बेंगळूर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. राजेंद्र प्रसाद यांनी या प्रस्तावाविषयी बोलताना, विद्यापीठात उपलब्ध विद्यार्थ्यांची संख्या आणि इतर कर्मचार्यांच्या उपलब्धतेच्या आधारे हा प्रस्ताव निश्चित केला जाईल. उल्लेखनीय आहे की बीबीएमपी दरवर्षी वृक्षारोपणांवर कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. असे असूनही बीबीएमपीकडे शहरातील किती झाडे आहेत याचा लेखाजोखा नाही. त्यामुळे कर्नाटक हायकोर्टाच्या फटकाऱ्यानंतर सुमारे ६ वर्षानंतर झाडे मोजली जात आहेत.