बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगर पालिका आयुक्तांनी (बीबीएमपी) कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरातील घरांमधून विघटन न केलेला कचरा संकलित करू नये, असे आवाहन केले आहे. जे कचरा वेगळा करणार नाहीत अशा घरांची माहिती बीबीएमपीला द्यावी असे त्यांनी निर्देश दिले आहेत. मग बीबीएमपी अधिकारी अशा घरांना कचरा वेगळा करण्याबाबत सल्ला देतील. जे कचरा वेगळा करणार नाहीत अशा घरातील कचरा गोळा केला जाणार नाही. दरम्यान अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी म्हंटले आहे.
वारंवार जनजागृती करूनही कचरा वेगळा न करणार्या कुटुंबांना दररोज १ हजार दंड आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्या व्यक्तींना अटक केली जाऊ शकते.