बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान राज्यातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. बुधवारी राज्यात ११ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर बेंगळूर शहरी जिल्ह्यात ८ हजाराहून बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरु करण्यास सांगितले आहे.
दरम्यान बृह बेंगळूर महानगर पालिका शुक्रवारपर्यंत १,५०५ बेडसह आठ कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरु करणार आहे. जिल्ह्यात ५७८ बेडसह दोन सीसीसी कार्यरत आहेत आणि ४२५ बेड ताब्यात घेत आहेत. डॉक्टर, स्टाफ नर्स, सपोर्ट स्टाफ आणि मार्शल यांची नेमणूक करून उपकरणे पुरविली जातील, असे म्हंटले आहे.









