बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमधील बसेस आणि मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद हळू हळू वाढू लागले आहे. कारण कोरोनाच्या प्रकरणामुळे बंद असलेली सेवा रुग्णसंख्या कमी होताच ५० टक्के क्षमतेने सुरू केली आहे. मेट्रो आणि बस सेवा सुरू करून तीन दिवस उलटून गेले आहेत.
कर्नाटकच्या राजधानीत बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (बीएमटीसी) प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे म्हंटले आहे. तसेच तिकीट संकलनातून मिळणारा महसूल ४५ लाख रुपयांवरून वाढून ९१ लाखांवर आला असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
दरम्यान, बीएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. तसेच प्रवाशांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की ग्रीन आणि जांभळ्या लाईन्स या दोन्ही सेवा केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेत आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत उपलब्ध असतात.