बेंगळूर /प्रतिनिधी
फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी शुक्रवारी बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रांच पोलिसांनी एका 28 वर्षीय इसमाला अटक केली आहे.
आरोपी शहरातील चमराजपेठ येथील रहिवासी असून त्याचे नाव मंजुनाथ असे आहे. सह. पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी आरोपीने फेसबुकवर बाल अश्लीलतेचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. याआधी त्याच्यावर चमराजपेठ पोलिस ठाण्यात दरोडा व फसवणुकीचे 8 गुन्हे दाखल आहेत. आम्ही त्याच्याकडे बाल पोर्नोग्राफी व्हिडिओंविषयी अधिक चौकशी करीत आहोत. असे म्हंटले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्याविरुध्द सायबर क्राइम पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.









