बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी बेंगळूर येथील रुग्णालयात खोटे निगेटिव्ह कोरोना अहवाल दिल्याबद्दल एका प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एका आशा कर्मचाऱ्याला निलंबित केले.
याबाबत माहिती देताना मंत्री सुधाकर यांनी शहरातील व्ही. व्ही. पुरम येथील एका प्रसूती रुग्णालयात झालेल्या प्रकारामुळे माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. माध्यमांमुळे आपल्याला या घटनेची माहिती मिळाली असे ते म्हणाले.
बीबीएमपी सहआयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकास तातडीने तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर या घडलेल्या प्रकारची माहिती मिळाली. खोटे कोरोना निगेटिव्ह अहवाल देणाऱ्या करारात असलेल्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आणि आशा कर्मचारी यांच्यावर एफआयआर नोंदविला जाईल, असेही मंत्री सुधाकर यांनी सांगितले.