बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमधील अन्नपूर्णाेश्वरी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शांताप्पा जादम्मनावर कामावर हजर होण्यापूर्वी दररोज एक तासासाठीप्रवासी कामगारांच्या मुलांसाठी शिकवणी घेत आहेत.
बेंगळूर पोलिसांच्या माहितीनुसार शांताप्पा गेल्या १५ दिवसांपासून विनायक नगर, नगरभावी येथील शेजारच्या झोपडपट्टीत मुलांना गणित, सामान्य ज्ञान आणि जीवन कौशल्य शिकवतात.
बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे. आमचे पोलीस उपनिरीक्षक कर्तव्याचा अहवाल देण्यापूर्वी दररोज एक तास प्रवासी कामगारांच्या मुलांना गणित, जीके आणि जीवन कौशल्य शिकवतात. असं त्यांनी म्हंटले आहे.