बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरातील पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली बेंगळूर पोलिसांनी बुधवारी तीन आरोपींना अटक केली. पोलिसांनी गाडीवरून जाणऱ्या या तिघांना रोखले आणि मास्क का घातला नाही असे विचारले असता तिघांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी जळहळ्ळी पोलीस ठाण्यातील आमच्या पथकाने पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे असे सांगितले. तिघांनीही मास्क घातला नसल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून दंड भरण्यास सांगितले. परंतु त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. पोलीस आयुक्तांनी आमच्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा हल्ले याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही असे म्हणत सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.