बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या नारकोटिक्स विंगने मंगळवारी रात्री शहरात अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १. २५ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपींनी बेंगळुरूच्या प्रमुख पबमध्ये डीजे म्हणून काम केले आहे. त्याने पब हॉपर आणि तरुणांना ड्रग्सची विक्री केली आहे. प्राथमिक तपासणीनंतर असे आढळले की त्याने डार्क वेब वापरुन ही ड्रग्स मिळवली आहेत.
यावेळी गृहमंत्री बसवराज बोम्माई आणि बेंगळुरू शहर पोलिस आयुक्त भास्कर राव यांनी भेट देत बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.