बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळुरूमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दरम्यान, सरकारने पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित कुटुंबाला २५ हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
शनिवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, महसूलमंत्री आर. अशोक, बीबीएमपी प्रशासक गौरव गुप्ता, बीबीएमपी आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद आणि बेंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत उपस्थित होते.
या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून प्रत्येक कुटूंबाला २५ हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले आहे. याद्वारे ते तातडीने आवश्यक वस्तू, कपडे, अन्न व इतर आवश्यक वस्तू खरेदी करू शकतील.