बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूरमधील शहर पोलिसांनी दोन जणांकडून चोरी केलेले साडेचार कोटी रुपये किमतीचे तुर्की चलन जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे शहरातील वेलकान्नी सर्कल येथे बनावट तुर्की चलन विक्री करण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान या नोटांवर तुर्कीमध्ये आधीच बंदी आहे. आमच्याकडे पाच लाख तुर्की लिराची किंमत असलेल्या ९७ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, ‘असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अटक केलेले दोघेजण तामिळनाडूमधील रहिवासी आहेत. सत्यवेलू आणि शारवाना अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बसमधून बेंगळूरला जात असताना या नोटा चोरल्या आहेत. आरोपी तुर्की चलन विक्री करतासल्याची विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास या दोघांना ताब्यात घेतले.









