बेंगळूर /प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान बृह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) पुढील ३० दिवसात खासगी ३० लाख लस देण्याचे ठरविले आहे. बीबीएमपीचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी याविषयी माहिती दिली आहे.
दरम्यान कोरोनाची तिसरी लहर सुरू होण्यापूर्वीच खबरदारी म्हणून प्रत्येकाला लसी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे २६ लाख लोक आहेत. त्यापैकी १५.४४ लाखाहून अधिक लोकांना पहिला डोस मिळाला आहे. या प्रकरणात ६० टक्के टक्के यश प्राप्त झाले आहे. तसेच उर्वरित लोकांना आणि दुसर्या डोससाठी चार लाख लस आवश्यक आहेत. शहरात एकूण १८ ते ४४ वयोगटातील एकूण ६४ लाख लोक आहेत. त्यापैकी ९ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. यासाठी खासगी रुग्णालये व संस्थांची मदत घेण्यात आली आहे.
लसीची कमतरता नाही
आयुक्त गुप्ता शहरातील कोरोना लसीकरण प्रक्रियेचा वारंवार आढावा घेत आहेत. तसेच पालिकेकडे लसींची कमतरता नसल्याचा दावा त्यांनी केला. पालिकेकडे पुरेसा साठा आहे. कोव्हॅक्सिनचे ५३,४०० डोस उपलब्ध असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. तसेच १८-४४ वयोगटातील लोकांसाठी कोविशिल्डचे २५,१४० डोस आहेत तर ४५,८६० डोस ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहेत.
घर-घर सर्वेक्षण
बृह बेंगळूर पालिकेने ४५ वर्षांवरील किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे लसीकरण ना झालेले लाभार्थी शोधण्यासाठी घर-घर सर्वेक्षण सुरू केले आहे. तसेच दुसर्या डोसच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना लसीकरणासाठी देखील बोलविले जात आहे. लसीकरण मोहिमेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी लसीकरण केंद्रांवर अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे.









